भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर   

नवी दिल्ली : भाजपने राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीला पुन्हा एकदा स्थगिती दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ तुर्तास कायम राहणार अहे.
 
पक्षाच्या राज्यघटनेनुसार, निम्म्याहून अधिक राज्यांत संघटनात्मक निवडणुका पूर्ण होईपर्यंत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकत नाही. सध्या १४ राज्यांत प्रदेशाध्यक्ष निवडले गेले असून अन्य राज्यांत प्रक्रिया सुरू आहे. नड्डा यांना २०१९ मध्ये कार्यकारी अध्यक्ष बनविले होते. त्यानंतर, २०२० मध्ये त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ २०२३ मध्ये संपणार होता. परंतु, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकाळ वाढविण्यात आला होता. 

Related Articles